उपराष्ट्रपती पदासाठी भाजपचे धक्कातंत्र : नाव निश्चित

Kolhapur news
By -

 

            


      नवी दिल्ली : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे उपराष्ट्रपतीपद रिक्त झालं आहे. उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. पुढच्या महिन्यात 9 ऑगस्टला उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी कोण उमेदवार असेल? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. कारण एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी जे. पी. नड्डा यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. 


एनडीएच्या आजच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.गेल्यावेळेच्या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीपेक्षा यावेळची निवडणूक जास्त रंजक असण्याची शक्यता आहे. कारण गेल्यावेळी एनडीएकडे बहुमत जास्त होतं. पण आता हे बहुमत तुलनेने कमी आहे. त्यामुळे ही निवडणूक जास्त चुरशीची होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एनडीएचा उमेदवार ठरला असला तरी इंडिया आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. इंडिया आघाडीकडून यावेळी कोणाचं नाव निश्चित होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे.


 इंडिया आघाडीचा चेहरा सर्व पक्षांसोबत चांगले संबंध असणारा, सर्वसमावेशक असा आश्वासक चेहरा राहिला तर एनडीएसाठी ते आव्हान असू शकतं. कारण यावेळी भाजपकडे कमी बहुमत आहे. परिणामी, ही निवडणूक अधिक रंजक होण्याची शक्यता आहे.


                ---------------------