नानीबाई चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कागल तालुक्यातील पहिले 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' अभियान संपन्न : ४३९ महिलांना पुरवली सेवा

Kolhapur news
By -

              


           कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


       कागल तालुक्यामध्ये सर्वात  प्रथम 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' अभियान महाशिबीर घेण्याचा बहुमान  नानीबाई चिखलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळाला. वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन सावंत यांचे मार्गदर्शनाखाली महाशिबीर नियोजनबद्धरीत्या पार पडले.


 कार्यक्रमाच्या प्रारंभी महिलांच्या सक्षमीकरणासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व  दीपप्रज्वलन करण्यात आले.अभियान विशेषतः महिलांसाठी समर्पित असल्याने सर्व मान्यवरांचे  स्वागत पुष्पगुच्छ देऊन सर्व आरोग्य सेविका यांचे हस्ते करण्यात आले.या अभियानात मध्ये महिलांची जनरल तपासणी, एक्सरे, इसीजी,बी पी, शुगर तपासणी,दातांचे आजार, त्वचा रोग, डोळे ई. तपासण्या , योग प्रशिक्षण देणेत आले व  हायस्कूल मध्ये जाऊन  किशोरवयीन मुलींना योग प्रशिक्षण  व मासिक पाळी मध्ये घ्यावायची काळजी याचे आरोग्य शिक्षण व वर्तवणुकीतील होणारे बदल ह्या विषयी मार्गदर्शन स्टाफ नर्स व योगा प्रशिक्षक यांचे मार्फत देणेत आले.  प्रा. आ.केंद्रातील सर्वच अधिकारी व कर्मचारी, समुदाय अधिकारी, आरोग्य सहय्यक व सहाय्यिका, आरोग्यसेवक व सेविका ,औषधनिर्माण अधिकारी,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ सहायक, चालक,परिचार, आशाताई,गट प्रवर्तक यांचा सक्रिय सहभागाने सुयोग्य नियोजन  व उपस्थित तज्ञ वैद्यकीय अधिकारी व तांत्रिक कर्मचारी यांच्या सहकार्याने शिबिर शिस्तबद्धपणे पार पडले. सदर शिबिरामध्ये तब्बल ४३९ महिलांना सेवा पुरवण्यात आल्या.


        कार्यक्रमासाठी सरपंच युवराज कुंभार , ग्रा.पं.  सदस्य, तसेच तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती कागल येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.महाशिबिरासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.फारुख देसाई सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


                महिलांची प्रतिक्रिया... 


              --------------------------