खडकेवाडा केंद्र शाळेत आधार कार्ड काढण्यासाठी आलेल्या विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप

Kolhapur news
By -

 

              


        कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


             खडकेवाडा केंद्र  शाळेमध्ये मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते पण आधार कार्ड काढणारे लोकच केंद्रशाळेकडे न फिरकल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना हेलपाटे मारावे   लागल्यामुळे पालकांच्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

     

          जवळपास २५ प्राथमिक व माध्यमिक शाळा मधील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आधार कार्ड काढण्यासाठी खडकेवाडा केंद्र शाळेमध्ये गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता बोलवण्यात आले होते . पण गुरुवारी आधार कार्ड काढणारे आलेच नाहीत , त्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना परत जावे लागले. त्यांना शुक्रवारी आधार कार्ड काढण्यासाठी येण्याचा निरोप दिला . परत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पालक व विद्यार्थी सकाळी दहा वाजता शाळेमध्ये आले, पण तरीही आधार कार्ड काढणारे आलेच नाहीत. दुपारी साडेबारा ते एक वाजेपर्यंत पालकांनी वाट बघून परत जाण्याचा निर्णय घेतला . आधार कार्ड काढण्यासाठी  जवळपास 200 ते 300 पालक आणि विद्यार्थ्यांना जो मनस्ताप सहन करावा लागला त्याविषयी पालकांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे. आता परत आधार कार्ड काढण्यासाठी कधी यावे लागणार हेही संबंधितानी ठोसपणे सांगितलेले नाही . 


           तांत्रिक अडचणीमुळे... 

        

तांत्रिक अडचणीमुळे सर्वर मध्ये व्यत्यय आल्याने आधार कार्ड काढायला कागल वरून येणारे लोक येऊ शकले नाहीत. 

              

           - संजय चिखलीकर

               प्रभारी केंद्रप्रमुख

               --------------------------