कोल्हापूर न्यूज नेटवर्क
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पंचाहत्तरीनंतर मी थांबलो नाही, मग पंतप्रधान मोदींना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असे ते म्हणाले. तसेच त्यांनी हैदराबाद गॅझेटसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही, यावरही त्यांनी भाष्य केले.
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राजकारणात कटुता नसावी, असे सांगत आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारानुसार वागणारी माणसे आहोत, असे ते म्हणाले.
माझ्या 75 व्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते. नरेंद्र मोदींनी राजकारण आणले नाही, आम्हीही आणत नाही. देशासाठी काय करायचं असेल तर त्यांनी करावे एवढीच अपेक्षा, असे शरद पवार म्हणालेत. तसेच पंचाहत्तरीनंतर मी थांबलो नाही, त्यामुळे नरेंद्र मोदींना पंचाहत्तरीनंतर थांबा, असे म्हणू शकत नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
---------------------