जिल्हाधिकारी मॅडमनी आपल्या जुळ्या मुलांना घातले अंगणवाडीत

Kolhapur news
By -

 

            





         नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी आपल्या दोन जुळ्या मुलांना अंगवाडीत प्रवेश देत एक आदर्श घालून दिला आहे. या शाळेत मराठी, आदिवासी, अहिराणी विद्यार्थी आहेत. सामान्यतः गरीब आणि गरजू कुटुंबांतील मुले अंगणवाडीत जातात, असा सर्वसामान्य समज आहे. मात्र, हा समज मिताली सेठी यांनी पूर्णपणे खोटा ठरवला आहे. नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे.


नंदुरबार शहरापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या टोकरतलाव येथील अंगणवाडीत जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी आपल्या मुलांचा प्रवेश घेतला आहे. या ठिकाणी शाळा आणि अंगणवाडी एकाच प्रांगणात आहे. त्यामुळे मुलांवर देखरेख ठेवण्यासोबतच शैक्षणिक वातावरणाचा अनुभव मिळेल, या हेतूने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.


      २०१७ च्या बॅचमधील महाराष्ट्र कॅडरमधील आयएएस अधिकारी मिताली सेठी यांनी डॉ. एमजीआर मेडिकल युनिव्हर्सिटी चेन्नई येथून दंतचिकित्सा विषयात एम.डी.एस. पदवी घेतली आहे. 


               ----------------------------