निपाणी : भारतीय सैन्याने पाकड्याचे कंबरडे मोडत दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी राबवलेल्या "सिंदूर ऑपरेशन" चे सुंदर कवित्व अजून देखील तसूभरही कमी झाले नसल्याचा दाखला आज देखील सर्वत्र जाणवत आहे. याच गोष्टीचे औचित्य साधत महाराष्ट्रासह कर्नाटकामध्ये 17 शाखांच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात मार्गक्रमणा करत असलेल्या राजमाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड निपाणी या शाखेतर्फे निपाणी मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
राजमाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा निपाणी यांच्यामार्फत "ऑपरेशन सिंदूर" यशस्वी झाल्याबद्दल भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदात्यांस राजमाता संस्थेकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात आली होती. रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे हा उदात्त हेतू ठेवून तब्बल 40 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती एक आश्वासक पाऊल टाकले असल्याचा संदेश सर्वत्र गेला. निपाणी अंकुर ब्लड सेंटरचे डॉक्टर व कर्मचारी यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे निपाणी व परिसरातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, कला, क्रीडा, साहित्य विश्वामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या डॉ. सी बी कुरबेट्टी, कबीर वराळे, दस्तगीर जमादार, संजय चोळके, यांना शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प, देऊन संस्थेतर्फे यथोचित सन्मान करण्यात आला. सत्कार मूर्तीनी देखील आपल्या मनोगतामध्ये संस्थे प्रति प्रेम व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमास राजमाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह चे चेअरमन अशोक गावडे, संचालक तुकाराम कोळी, विजय खटावकर, संजय सावंत, सल्लागार समीर बागवान, पार्श्वनाथ चौगुला, अरुण पाटील संस्थेचे विभाग प्रमुख जगदीश निंबाळकर यांच्यासह लीना रेडेकर, विशाखा खडके, मानसी कोकरे, वेदिका पाटील, आकाश निकम, शिवाणी दोडमणी, महादेव गायकवाड, गिरीश शहा, बेबीताई कोळी अनिल पारळे, आशा खटावकर, ललिता सावंत, बाळासो तोडकर व इतर बहुसंख्य लोकांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, स्वागत, प्रास्ताविक व आभार संस्थेचे संचालक तुकाराम कोळी यांनी केले.
----------------------------