ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान

Kolhapur news
By -

 

               


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


 १७ सप्टेबर पासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाच्या पार्श्वभुमी वर मौजे वडगाव ग्रामपंचायतीच्या  शाहू सभागृहात विशेष ग्रामसभा पार पडली .

         ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत ,पंचायत समिती व जिल्हा परिषदांना प्रोत्साहीत करण्यासाठी २०२५ - २६ या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे . या अभियानांतर्गत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये ३१ डिसेंबर पर्यंत विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती सरपंच कस्तुरी पाटील यांनी दिली .

       यामध्ये सुशासनयुक्त व लोकाभिमुक पंचायत प्रशासन ,आर्थिकदृष्ट्या सक्षम पंचायत , जल समृध्द , स्वच्छ व हरितगाव , रोजगार हमी व इतर योजनांचे अभिसरण, गाव पातळीवर संस्था सक्षमीकरण , उपजिविका विकास व सामाजिक न्याय , लोकसहभाग व श्रमदानातून लोकचळवळ निर्माण , या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी भारती ढेंगे पाटील यांनी मार्गदर्शन केले . 

         या निकषांच्या आधारे ग्रामपंचायतीचे मुल्यांकन केले जाणार असून तालूका , जिल्हा, विभाग व राज्य या स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत . यावेळी तलाठी सचिन चांदणे यांनी पाणंद रस्त्या संदर्भात माहिती दिली तर कृषी सहायक उमेश सकटे व डॉ पंकज पाटील यांनी आपआपल्या विभागाची सखोल माहिती देऊन मनोगत व्यक्त केले.

         यावेळी सरपंच कस्तुरी पाटील , उपसरपंच स्वप्नील चौगुले, ग्रामपंचायत अधिकारी भारती ढेंगे पाटील , माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुनिल खारेपाटणे ,सुरेश कांबरे , रघुनाथ गोरड , नितिन घोरपडे , सुवर्णा सुतार, सुनिता मोरे , सविता सावंत ,दिपाली तराळ ,मधुमती चौगुले , माधूरी आकिवाटे , तंटामुक्त अध्यक्ष मधुकर आकिवाटे , महिला बचत गट ,विविध संस्थांचे पदाधिकरी, शासकीय कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .


             ----------------------