कोल्हापूर न्यूज नेटवर्क
प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या नवरात्रोत्सवात मुरगूड येथे दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात येते. असत्यावर सत्याचा विजय, अधर्मावर धर्माची मात हे दान आपल्या भारतीय संस्कृतीने दिले आहे.प्रभू रामचंद्रांनी सर्वसामान्यांना एकत्र करून महाप्रतापी पण अधर्मी रावणाच्या लंकेवर स्वारी केली. त्याचा वध केला.त्या विजयाची आठवण म्हणजे दसरा महोत्सव होय.
युवक आणि कौमार्यातील मुले मुली या दौडी मध्ये सहभागी होतात. भगव्या टोप्या घालून रोज ही दौड केली जाते.भारत माता की जय,दुर्गा माता की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून जातो.देशभक्तीपर गीते गायिली जातात. केवळ सण नव्हे तर चैतन्यदायी उत्सव म्हणून विजयादशमी चे स्वागत करण्याची ही प्रथा येथील राष्ट्रीय विचारांच्या युवक युवती व नागरिकांनी सुरू केली आहे.हे लोन आता ग्रामीण भागात सुद्धा पसरू लागले आहे. सुवासिनिंच्या मार्फत या दौडीचे आरती ओवाळून औक्षण करण्यात येते. या उपक्रमांचे औत्सुक्यपूर्ण स्वागत होत आहे. दौडीचा मार्ग राणाप्रताप चौक ते महालक्ष्मी मंदिर,गावभाग तलाव ते शिवतीर्थ असा असतो.
---------------------