कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड मध्ये वेदगंगा नदीत विसर्जन न झालेल्या जवळपास पाचशे गणेश मूर्ती पाण्याच्या काठावर विस्कटलेल्या अवस्थेत पडून होत्या .मूर्तींची विटंबना होऊ नये व विसर्जनाचा दुसरा पर्याय शोधावा असे वृत्त कोल्हापूर न्यूज नेटवर्क वर प्रसिद्ध झाले.
हे वृत्त शहरभर वाऱ्यासारखे पसरले तेंव्हा येथील अनेक शिवभक्तांनी एकत्र येऊन काठावरच्या त्या मूर्तींचे पुन:विसर्जन करायचे ठरविले .
कुरणी बंधारा तसेच दत्त घाट येथील अशा सर्व मूर्ती त्यांनी पुन: खोल पाण्यात विसर्जित केल्या.कांहीं ठिकाणीं पाण्याची पातळी जास्त असलेने युवकांना पोहत जावे लागले.हे काम तीन तास अविश्रांत सुरू होते.
काठावर झालेला कचरा सुध्दा त्यांनी साफ केला .त्यांच्या या अथक परिश्रमामुळे गणेश मूर्तींची विटंबना व्हायचे टळले.जनावरे,श्वान ,पक्षी इत्यादींचा वावर यामुळे या मूर्तींची विटंबना होण्याची शक्यता होती.
घरगुती गणेश मूर्ती व शहरातील गणेश मंडळाच्या मोठाल्या मूर्ती यांचाही यात समावेश होता.एक ट्रॉली भर कचऱ्याची सुध्दा विल्हेवाट लावण्यात आली. या कामी शिवभक्तांना हिंदुत्व वादी संघटनेचे स्वयंसेवक आणि नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी यांनी सुध्दा उत्स्फूर्त सहकार्य केले.सर्व युवकांचे गणेशभक्तांनी कौतुक केले व ऋण व्यक्त केले.
या मोहिमेत सहभागी झालेले युवक याप्रमाणे...
तानाजी भराडे,बबन बारदेस्कर ,सर्जेराव भाट,ओंकार पोतदार,संकेत शहा व अन्य सहकारी.