शिक्षण संस्था चालक संघाचे अध्यक्ष व.ज. देशमुख यांना कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची भावपूर्ण श्रद्धाजंली.

Kolhapur news
By -

 


               

          


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क


कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, को. जि. मुख्याध्यापक संघ, को. जि. शिक्षण संस्था चालक संघ व श्री लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने व.ज. देशमुख यांना गडकरी हॉल येथे संपन्न झालेल्या शोकसभेत भावपूर्ण श्रद्धाजंली वाहण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षक आमदार जयंत आसगावकर होते.

      

आम. आसगावकर म्हणाले , जिल्हा संस्था चालक संघाचे भरीव कार्य देशमुख दादांनी केले. स्वतः च्या संस्थेचे कुटुंब प्रमुख म्हणून सर्वांची काळजी घेतली. संस्था चालकांचे वाद सोडविण्यासाठी त्यांनी मदत केली. 

   

 शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड यांनी देशमुख दादांच्या शैक्षणिक, सामाजिक व औद्योगिक कार्याचा गुणगौरव करून त्यांच्या संस्थेच्या कार्याचा गौरव केला.

   

यावेळी आर. वाय. पाटील,सुनिल कुरणे, बी. जी. बोराडे, प्रभाकर हेरवाडे, भरत रसाळे, प्रा. सी. एम. गायकवाड, व्ही. जी. पोवार, प्रा. सुभाष जाधव, विष्णू पाटील, रणजित देवाळकर, आर. बी. पाटील, उमेश देसाई, सविता काळे, शिवाजी माळकर, बाबा पाटील आदींनी देशमुख दादांच्या कार्याचा गौरव केला.

  

 या शोकसभेस मुख्याध्यापक संघ चेअरमन राहुल पवार,सुधाकर निर्मळे,उदय पाटील, के. के. पाटील,सुधाकर सावंत, इरफान अन्सारी, सयाजी पाटील, गजानन काटकर, प्रकाश पाटील, सुनिल कल्याणी आदी मान्यवरांसह शिक्षक - शिककेत्तर संघटनेचे पदाधिकरीसह शिक्षकवृंद उपस्थित होते.

      


व.ज. देशमुख यांना शोक सभेत श्रद्धाजंली वाहतांना शिक्षक आमदार जयंत आसगावकर, एस. डी. लाड, बी. जी. बोराडे,आर. वाय पाटील आदीसह अन्य मान्यवर.