अंगावर रोमांच उभा करणारा मुरगूड मधील पावन खिंड देखावा.

Kolhapur news
By -

 

                   


                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      घरगुती गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर लगेचच मुरगूड मध्ये विविध  मंडळांचे देखावे पाहण्यासाठी खुले करण्यात आले.एकाहून एक सुंदर देखावे पाहण्यास अबाल वृद्ध गर्दी करू लागले. देखाव्यांचा आजचा शेवटचा दिवस आहे.

    

   सजीव देखाव्यामध्ये  व्यापारी पेठेचा महागणपती गणेश तरुण मंडळाचा पावन खिंड युध्दाचा देखावा अंगावर रोमांच उभा करणारा आहे.

  

   महाराजांच्या वेषातील शिवा काशिद ,लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे म्हणून घोडखिंडीत पहाडा सारखे उभा राहिलेले बाजी प्रभू देशपांडे यांचे तसेच  बांदल सेनेतील नरवीरांचे साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे.तो इतिहास या देखाव्याचे जणू सजीव केला होता.

  

  शिवा काशिद आणि  बाजी यांच्या चेहेऱ्यावरील विरश्रीचे भाव पाहून छाती अभिमानाने भरावी आणि स्वराज्यासाठी जीवन उधळून देण्याची त्यांची तयारी पाहून डोळ्यातून अश्रु धाराही वहाव्यात असा हा देखावा पाहण्यासाठी अलोट गर्दी होत आहे.


    विशेष म्हणजे अलीकडेच विशाळगडावरचे अतिक्रमण प्रकरण बरेच गाजले होते.त्याची पार्श्वभूमी या देखाव्यास  लाभली होती.