कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगुड येथील शिवतेज सम्राट मसवेकर इंडियन नेव्ही मध्ये सब लेफ्टनंट पदी निवड झाली.. केरळ मधील इजिमाला येथे त्याचे एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले.
शिवतेज मसवेकर याचे दहावीपर्यंतचे शिक्षण मूरगुड येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये झाले आहे... तर जुनिअर कॉलेज स्वामी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे झाले त्यानंतर के आय टी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधून त्याने मेकॅनिकल ची डिग्री घेतले आहे... एस.एस.सी टेक या संरक्षण दलातील परीक्षेमध्ये पास होऊन त्याची डिसेंबर 2023 ला सब लेफ्टनंट पदाच्या प्रशिक्षणा साठी निवड झाली होती.. एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून शिवतेज मसवेकर हा नौदलात दलात देश सेवेसाठी सज्ज झाला आहे.. एस.एस. सी.टेक ही परीक्षा पास होऊन सब लेफ्टनंट पदी सरळ निवड होणारा शिवतेज मसवेकर हा मूरगूड मधील पहिला विद्यार्थी आहे... शिवतेज चे आजोबा कै.भरत मसवेकर हेही इंडियन एअर फोर्स मध्ये होते..
मसवेकर घरात पहिल्यापासूनच सैन्य दलात जाण्याची परंपरा आहे.. मुरगुड मधील तिघे सख्खे भाऊ कै. रामचंद्र गणपती मसवेकर कै. भरत गणपती मसवेकर व रवींद्र गणपती मसवेकर यांचे नातू सब लेफ्टनंट शिवतेज मसवेकर, सब लेफ्टनंट साईराज पाटील, सार्थक मसवेकर .. हे तिघेही आज नौदलात कार्यरत आहेत हा एक दुर्मिळ योगायोग आहे... शिवतेच्या या यशामध्ये त्यांच्या आई-वडिलांसोबत सर्व गुरुजन, शौर्य ग्रुप कोल्हापूर, त्याचे चुलते पृथ्वीराज मसवेकर, आजोबा रवींद्र मसवेकर यांचे फार मोठे योगदान आहे.
---------------------------------

