कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड मधील सार्वजनिक फलक तसेच उपनगरांच्या नावाचे फलक आचारसंहितेत झाकून ठेवले होते.
ते फलक आता उघडे करावेत अशी मागणी शिवभक्त सामाजिक संघटनेने केली आहे.
मुरगूड शहराच्या प्रवेश द्वाराची कमान सुध्दा अद्याप झाकलेली दिसते.
त्यापेक्षा वाढदिवस शुभेच्छांचे मोठाले फलक जागजागी लागतात त्यांना बंधन असावे.केवळ प्रसिद्धीची हाव हे कारण त्यामागे असते.कसलेही सामाजिक योगदान नसलेले लोक व अल्पवयीन मुलांचे सुध्दा असे फलक लागलेले असतात.त्यामुळे शहराचे नाहक विद्रुपीकरण होते असे मत या कार्यकर्त्यांनी मांडले.
------------------------

