2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. मंगळवारी रावळपिंडी स्टेडियमवर दिवसभर अधूनमधून पाऊस पडत होता. अशा परिस्थितीत सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे.
ग्रुप बी च्या पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे आणि दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोघांचेही 3-3 गुण आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात दोघेही पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार होते. दोघांनीही प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला हरवले, तर दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला हरवले.

