कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथील संत ज्ञानेश्वर कॉलनीतील अथर्व अनिल रायजाधव याची हॉटेल व्यवस्थापन प्रशिक्षणासाठी मॉरिशस येथील आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे.
तेथे तो सहा महिन्याचे प्रशिक्षण घेऊन पुन्हा भारतात येणार आहे.निपाणी बाळूमामा रस्त्यावर त्याच्या वडिलांचे हॉटेल आहे.तेथे त्याने प्राथमिक सराव केला.
मॉरिशस मधून आल्यानंतर आदर्श हॉटेल व्यवसाय सुरू करण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली.
गारगोटी हे अथर्वचे गाव असून व्यवसायकरीता त्याचे कुटुंब मुरगूड येथे स्थायिक झाले आहे.अथर्व चे दहावी पर्यंतचे शिक्षण मुरगूड येथील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये झाले.
कोल्हापूर येथे त्याने हॉटेल व्यवस्थापन कोर्समध्ये प्रथम श्रेणी नामांकन मिळविले व मॉरिशस मधील प्रशिक्षणाची त्याला संधी मिळाली.
त्याला निरोप देण्यासाठी त्याचे नातेवाईक ,मित्रपरिवार व त्याचे कांहीं शिक्षक उपस्थित होते.
--------------------------------------------

