कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे.सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट व जगदीश गुरव यांनी ही बाब लगेच नगरपरिषदेच्या निदर्शनास आणून दिली व गांभीर्याने दखल घ्यावी असे निवेदनही दिले आहे.
चिमगाव रस्त्यावरील बिरोबा पाणंद येथे ही टाकी आहे.पाणी वाहून जाण्याचा प्रकार बरेच दिवस सुरू आहे तरीही तिकडे दुर्लक्ष होत असलेने नागरिक संतप्त झाले आहेत.
पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असताना इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाणे ही बाब निश्चितच गंभीर स्वरूपाची मानली जाते.तातडीने कार्यवाही व्हावी अशी मागणी नगरपालिकेकडे करण्यात आली आहे.
निवेदनावर माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांच्यासह दत्तात्रय मंडलिक,सर्जेराव भाट,जगदीश गुरव,समाधान हेंदळकर ,विजय गोधडे,शशिकांत पाटील इत्यादींच्या सह्या आहेत.
--------------------------------------


