बाळूमामा नगरसह संभाजीनगर आणि टीचर्स कॉलनी मधील विजेचा प्रश्न निकाली निघणार : 63 K.V.A क्षमतेचा टीसी उभारणीच्या कामास सुरुवात

Kolhapur news
By -

 

             



                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     निपाणी राधानगरी राज्यमार्गानजीक व देवचंद कॉलेज समोर असणाऱ्या बाळूमामानगरमध्ये मा. खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून  63 K.V.A क्षमतेचा टीसी उभारण्याचे काम सुरू झाले आहे.


       बाळूमामा नगरसह ,संभाजीनगर आणि टीचर्स कॉलनी मधील नागरिकांना अधून मधून भेडसावणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येला गेल्या अनेक वर्षापासून सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या तीन नगरांच्यासाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर उभारला जावा अशी मागणी केली जात होती. 


      नागरिकांना भेडसावणाऱ्या या विजेच्या समस्येची दखल घेऊन मा. नगरसेवक  उदय नाईक यांनी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. या तीन नगरातील विजेची समस्या लक्षात घेऊन अण्णासाहेब जोल्ले व शशिकला जोल्ले यांनी निपाणीतील केईबी मधील अधिकाऱ्यांना ही समस्या सोडवण्याविषयी सूचना केल्यानंतर हा ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला असून विजेची समस्या निकालात निघणार आहे .त्यामुळे या नगरातील नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त  केले जात आहे. टीसी उभारणीच्या कामास सुरुवात झाली असून येत्या चार दिवसात तो कार्यान्वित केला जाणार आहे. 


        ----------------------------------------------