कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सोशल मीडियाच्या जोखडातून विद्यार्थ्यांना मुक्त करणेची जबाबदारी आज शिक्षकांनी घेणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाच्या पाठबळावर अभ्यास करून आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे. शिका व खेळा आपले शरीर तंदुरुस्त राखा तरच तुमचा भविष्यकाळ उज्वल राहील. असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघाचे अध्यक्ष मुरगुड चे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी केले.
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगूड येथील वार्षिक पारितोषिक वितरण स्नेहसंमेलन कार्यक्रमात अध्यक्ष भाषणात बोलत होते. शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक शिक्षण महर्षी एम. आर. देसाई, बॅ. बाळासाहेब खर्डेकर, कै.सुशिलादेवी देसाई, गुरुवर्य ग.बा.सावंत, माजी आमदार कै. दिलीपराव देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आली.
यावेळी शाहू कृषी संघाचे अध्यक्ष अनंतराव फर्नांडिस, मुरगुड चे माजी नगरसेवक जयसिंग भोसले, पालक संघाचे उपाध्यक्ष रणजीत भोसले, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष रश्मी सावंत प्रमुख उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य एस. पी. पाटील यांनी केले. यावेळी उपप्राचार्य एम.डी.खांटागळे, उपमुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी, पर्यवेक्षक एस.डी.साठे, पी.बी लोकरे , ए.एस.मांगोरे ,बी.के वाघमोडे , एम. एस कांबळे, एम. एच. खराडे ,एस. एस. कळंत्रे, एल. एस. डेळेकर,ए. ए. सावंत, वा.ई देशमुख, पी. एस .पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी तर आभार एस.डी.साठे यांनी मानले.
मुरगूड : येथील मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड येथे पारितोषिक वितरण करताना शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील ,अनंतराव फर्नांडिस ,जयसिंग भोसले ,प्राचार्य एस. पी. पाटील आदी मान्यवर.
----------------------------------------


