नागपूर :राजकारणात एकमेकांवर आरोप करणारी नेते मंडळी संकट काळात मात्र राजकीय मतभेदांचा विचार करीत नाहीत, एकमेकांच्या मदतीसाठी धावतात. याचे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले आहे.
शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रकाश गजभिये हे कुटुंबासोबत काश्मीरला फिरायला गेले होते. बर्फावरून पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली. त्यांना तातडीने जम्मू येथील एम्स इस्पितळात दाखल करण्यात आले होते. ते कोमात गेले होते. त्यामुळे सर्वांची धाकधूक वाढली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही बाब कळताच त्यांनी तातडीने त्यांच्या कुटुंबीयांसोबत संपर्क साधला. प्रकाश गजभिये यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष विमानाने मुंबई येथील लीलावती रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले . त्यांचा एम्स रुग्णालयाचा वैद्यकीय खर्च भरून त्यांना विशेष विमानाने मुंबईला आणले आणि लीलावती रुग्णालयात दाखल केले. त्यांचा दिल्ली ते मुंबई खासगी विमानाचा २० लाखांचा खर्च देखील राज्य शासनाने केला.त्यांची प्रकृती स्थिर आहे.
‘राजकारणाच्या पलिकडे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधिलकी जपली’, अशा शब्दांत प्रकाश गजभिये यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
-----------------------------

