छावा चित्रपटाचे कला दिग्दर्शक दिलीप रोकडे यांची जयहिंद चित्रमंदिरास भेट.

Kolhapur news
By -

 

             


                      कोल्हापूर न्यूज नेटवर्क


       छावा या देशभर गाजत असलेल्या चित्रपटाचे कला दिग्दर्शक कोल्हापूर चे सुपुत्र दिलीप रोकडे यांनी मुरगूड येथील  जयहिंद चित्र मंदिरास भेट दिली.

  चित्रपटास मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे सर्वेक्षण हेतूस्तव त्यांनी ही भेट दिली.चित्रमंदिराचे मालक खाशाबा भोसले यांनी त्यांचे स्वागत केले.

     चित्रपटाविषयी बोलतांना रोकडे म्हणाले छावा हा केवळ एक चित्रपट नाही .अत्यंत प्रेरणदायक अशी भव्य ऐतिहासिक कलाकृती आहे.

  छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रमावर आधारित हा चित्रपट असून त्यातील युद्ध प्रसंग व संघर्ष साकारताना आपोआपच कलाकारांनाही स्फुरण चढते.

   चित्रपटाची भव्यता साकारण्यात दिलीप रोकडे यांचा मोलाचा वाटा आहे.कलादिग्दर्शनातील अनेक बारकावे त्यांनी प्रेक्षकांसमोर मांडले .इतर भव्य हिंदी चित्रपटांच्या तोडीचा हा चित्रपट असल्याचे त्यांनी नमूद केले.अनिल पाटील,सर्जेराव भाट,यदुवीर रावण,अनिल रावण,जगदीश गुरव ,समाधान हेंदळकर,उमेश कुलकर्णी,सागर चौगले ,ओंकार पोतदार ,यांची उपस्थिती होती.


           -----------------------------------