थोर स्वातंत्र्य सेनानी स्वा.सावरकर यांना हिंदुत्ववादी संघटनांचे अभिवादन .

Kolhapur news
By -

 

                





                         कोल्हापूर न्यूज नेटवर्क


         स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सकल हिंदुत्ववादी संघटनांचे वतीने आज मुरगूड येथे त्यांच्या स्मृती दिनी विनम्र अभिवादन करण्यात आले.

     स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या धगधगत्या आणि स्फूर्तिदायक इतिहासाला यावेळी उजाळा देण्यात आला.

    अंदमानचा अत्यंत कठिण असा  तुरुंगवास त्यांनी देशासाठी सोसला.

  देशातील सकल हिंदूंचे संघटन करण्यासाठी सारे आयुष्य त्यांनी वेचले.त्यांच्या या योगदानाला तोड नाही.

    विनायक दामोदर सावरकर हे फक्त नाव नाही तर तेज,त्याग, तप,तर्क , तारुण्य, तीर,तलवार, तिलमिलाहट,तितिक्षा, तिखट अशा बहूआयामी व्यक्तिमत्त्वाचा तेजःपुंज पोत आहे असे त्यांचे वर्णन केले जाते.

      संघटने मार्फत त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रभक्तीपर गीते   ऐकवण्यात  आली.


 "गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्याही गाली स्वतंत्रते तुझीच ती विलसतसे लाली  "


     या किंवा 


"सागरा प्राण तळमळला ने मज परत मातृभूमीला.*


    या गीतांमधून त्यांची काव्य प्रतिभा आणि राष्ट्रभक्ती दिसून येते असे वक्त्यांनी उद्गार काढले.


    वंदे मातरम् व भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.


    

        -------------------------------------------------