प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालया मार्फत मुरगूड येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त बारा ज्योतिर्लिंगाचा विलोभनीय देखावा.

Kolhapur news
By -

 

             


                       कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालया मार्फत मुरगूड येथे महाशिवरात्री उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.


     गोकुळ चे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांच्या हस्ते शिवध्वजाचे पूजन व आरोहण करण्यात येऊन शिवगीत गाण्यात आले.त्यांच्या हस्ते बारा ज्योतिर्लिंग देखाव्याचे उद्घाटन करून तो भाविकांच्या साठी खुला करण्यात आला.


    हा देखावा इतका अप्रतिम होता की देशातील सर्व ज्योतिर्लिंगाचे साक्षात दर्शन घडल्याचे समाधान भाविकांच्या चेहऱ्यावर पहायला मिळाले.


    हा देखावा भाई अनिल  आंगज व राजू कांबळे यांच्या अप्रतिम कलात्मकेतून साकार झाला.केंद्र प्रमुख लता बहेंनजी ,लक्ष्मी बहेंनजी ,भिकाजी भांदीगरे,तानाजी कोरे,तुकाराम भांबरे,शशिकांत जाधव,रामचंद्र पाटील,हिंदुराव भारमल,विठ्ठल लोहार,विठ्ठल भाकरे इत्यादींचे त्यांना प्रोत्साहन व सहकार्य लाभले.


      या पवित्र सोहळ्या च्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल रणजित सिंह पाटील,रवींद्र शिंदे, वि.रा.भोसले ,प्रवीण सूर्यवंशी यांनी आपली मनोगते मांडली व अभिनंदन केले. तीन तालुक्यातील शेकडो पुरुष व महिला भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित होते.बारा ज्योतिर्लिंग देखावा तीन दिवस भाविकांच्या दर्शनासाठी खुला ठेवण्यात येणार आहे.


     उपस्थित सर्व भक्तगणांना फराळ व ईश्वरीय  भेट यांचे वितरण करण्यात आले.





   -------------------------------------------------