कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पंचशील नगर येथील कालथीत दांपत्य आयु. वसंतराव कांबळे (प्राथमिक शिक्षक) व आयु. विश्रांती वसंतराव कांबळे (प्राथमिक शिक्षिका) यांचे सुपुत्र आयु. विजय वसंतराव कांबळे (इंजिनीयर) यांनी आज मंगळवारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर या शाळेला ५००० रुपयाच्या खुर्च्या शाळेला दान केल्या व त्याचबरोबर प्रशालेच्या प्रस्तावित बगीचा तयार करण्यासाठी ५००० आर्थिक रोख रकमेच्या स्वरूपात दान केले. गावापासून दूर पुण्यासारख्या उच्चभ्रू शहरात नोकरीनिमित्त स्थायिक झालेले तरीसुद्धा गावाकडील समाजातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणाविषयी कळवळा व "डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर शाळेची परिस्थिती सुधारावी व समाजातील मुलांना सर्व सोयींनी सुसज्ज आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी एकूण १०,००० रुपयाची मदत केली . शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे .
------------------------------------


