महाराष्ट्र कर्नाटक एसटी सेवा पूर्ववत होणार : कोल्हापूर , बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार, पुढील निर्णय लवकरच

Kolhapur news
By -

 

        


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


कर्नाटक येथील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या चालकाला मारहाण करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ राज्य परिवहन मंडळाने कर्नाटकात जाणाऱ्या बस फेऱ्या बंद केल्या होत्या. यामुळे सीमाभागातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. यावर आता तोडगा काढण्यासाठी व बस फेऱ्या पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे.


महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील बससेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी व बेळगावचे जिल्हाधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली आहे. बस सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि सुरक्षा या विषयांवर दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली असल्याचे समजते. या बैठकीला कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व बेळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळदे उपस्थित होते.


           --------------------------------------