मुलीच्या जन्मदिनी राखलं निसर्ग संवर्धनाचे भान : प्रज्ञाशोध परीक्षेसह इतर उपक्रमांचे ही आयोजन

Kolhapur news
By -

            


                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क

   प्रत्येक जण जन्मदिनी केक, जेवणावळीचे आयोजन करून आपल्या पैशाचा अपव्यय करताना दिसतात.डी जे लावून ध्वनी प्रदूषण करतात.पण या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन शैक्षणिक,पर्यावरणपूरक, सामाजिक बांधिलकी जपणारे दीपस्तम्भ संस्थेचे अध्यक्ष देव सरांनी आपली सुकन्या हिरण्या हिच्या जन्मदिनी खडकेवाडा केंद्रातील नानीबाई चिखली कुमार विद्यामंदिरमध्ये  ४ थी व ७ वी प्रज्ञशोध सराव चाचणीचे आयोजन केले होते. त्याचबरोबर फळे वाटप,मिरज सांगलीतील ऊसतोड कामगारांना धान्य वाटप, वृद्धाश्रमात फळे वाटप,श्री.चौंडेश्वरी देवराई हमिदवाडा येथे वृक्षारोपण करून समाजाला एक नवी दिशा दिली.


 केंद्रशाळा खडकेवाडा येथे संविधान प्रति वाटप आणि पेपर उदघाटन कार्यक्रम काका घोरपडे,योगेश साबळे,संजय चिखलीकर, अंजना आजगेकर केन्द्रातीलसर्व शिक्षक बंधुभगिनी यांचे उपस्थितीत पार पडला.


प्रास्ताविक संजय चिखलीकर यांनी केले. श्री.नामदेव चौगुले यांनी देव सरांच्या कार्याचा परिचय करून देत त्यांचा सत्कार करताना डायरी,गुलाब रोपटे भेट दिले.तर आभार रवी पाटील यांनी मानले.


इयत्ता चौथीचे यशस्वी विद्यार्थी :

ओमराजे रमेश कदम प्रथम क्रमांक - विद्या मंदिर गलगले ,नित्यश्री विनोद मगदूम द्वितीय- कन्या विद्यामंदिर चिखली, अद्वैत भैरवनाथ जिरगे, तृतीय क्रमांक - कुमार विद्यामंदिर चिखली ,, सिद्दीक दादासो नाईक चतुर्थ क्रमांक -कुमार विद्यामंदिर चिखली , वरद पांडुरंग माळुंगे, पाचवा क्रमांक- विद्यामंदिर गलगले . 


इयत्ता सातवी यशस्वी विद्यार्थी  : 

   लावण्या विजय जाधव प्रथम क्रमांक - विद्यामंदिर गलगले, स्वयंम सतीश गायकवाड, द्वितीय क्रमांक- कुमार विद्यामंदिर चिखली, केतकी उत्तम पाटील ,तृतीय क्रमांक- विद्यामंदिर गलगले, प्राजक्ता मारुती कुंभार चतुर्थ क्रमांक - विद्यामंदिर गलगले, वेदांती विलास शिंदे पाचवा, क्रमांक- विद्यामंदिर गलगले. 


यशस्वी विद्यार्थ्यांना शिल्ड प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले .


यावेळी वासुदेव कांबळे, खडकेवाडा केंद्रप्रमुख संजय चिखलीकर, अर्जुनवाडा माजी उपसरपंच विशाल कुंभार ,नामदेव चौगुले, चिखलीचे विश्वनाथ मगदूम,   खडकेवाडाचे नियाज देसाई,  नंदकुमार भोसले ,संजय चिंगळे ,चिखली कुमार शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संतोष काटकर ,गलगले विद्या मंदिर शाळा व्यवस्थापन अध्यक्ष विजय जाधव ,कुमार चिखलीचे मुख्याध्यापक सुरेश ढेकळे, गलगले विद्यामंदिर मुख्याध्यापक पांडुरंग कापसे ,सर पिराजीराव पतसंस्थेचे संचालक रमेश कदम ,कागल तालुका पतसंस्थेचे आनंदा साळाेखे , संजय खुडे ,कल्पना कुंभार, नूतन सकट, ,शहनाज सय्यद, ज्योती जिरगे व पालक उपस्थित होते. 

  

या विधायक उपक्रमाबद्दल वासुदेव कांबळे यांचा सत्कार हमीदवाडा येथे सरपंच कृष्णात बुरटे, विशाल कुंभार माजी  डे. सरपंच अर्जुनवाडा,दिनकर लाटकर, विनोद पाटील, नामदेव चौगुले यांचे उपस्थितीत करणेत आला.


           -----------------------------