कोल्हापूर न्यूज नेटवर्क
उत्तराखंड येथे दिनांक 9 ते 14 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या 38 व्या नॅशनल गेम्स कुस्ती स्पर्धेसाठी लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय SAI कुस्ती संकुल मुरगूडच्या महिला व पुरुष एकूण 6 कुस्तीगीरांची महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड
*महाराष्ट्र राज्याच्या कुस्ती संघात एकाच आखाड्यातील सर्वात जास्त कुस्तीगरांची निवड*
या स्पर्धा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (भारत सरकार च्या ) वतीने उत्तराखंड येथे पार पडत आहेत.
तसेच बेंगलोर येथे झालेल्या वरीष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत या कुस्तीगीरांनी पदक मिळवल्यामुळे निवड करण्यात आली आहे.
निवड झालेले कुस्तीगीर खालील प्रमाणे...
पुरुष ग्रिकोरोमन विभाग
७७ कीलो - पै. सुशांत पालवे
९७ कीलो - पै. रोहन रंडे
महीला विभाग
५० कीलो - पै.नंदीनी साळुंखे
५३ कीलो - पै.स्वाती शिंदे
६८ कीलो - पै.शिवानी मेटकर
७६ कीलो - पै.अमृता पुजारी
मार्गदर्शक
त्यांना एनआयएस आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच दादासो लवटे ,माजी नगराध्यक्ष ,वस्ताद सुखदेव येरुडकर ,दयानंद खतकर ,सागर देसाई यांचे मार्गदर्शन
प्रोत्साहन
माजी खासदार.संजयदादा मंडलिक,कार्याध्यक्ष विरेंद्र मंडलिक ,साई राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण , कार्यवाह आण्णासो थोरवत, डॉ.प्रशांत अथणी ( निपाणी ) ,जय शिवराय एज्युकेशन सोसायटी व मुरगूड नगरपरिषद यांचे प्रोत्साहन लाभले .
--------------------------------------------






