कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदान प्राप्त (२००५ पूर्वी) शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना १९८२ जूनी पेन्शन योजना अद्याप मान्य न झालेने शुक्रवार दिनांक ७/२/२०२५ रोजी एक दिवसीय पुणे आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन तसेच मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये उपोषण करणार असलेचे निवेदन आयुक्त शिक्षण पुणे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनाचा आशय असा की, महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदान प्राप्त (२००५ पूर्वी) शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने हिवाळी अधिवेशन नागपूर आंदोलन करण्यात आले होते. सदर आंदोलनाची शासनाने अद्याप दखल घेतलेली नाही. मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षण आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली केवळ १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः अनुदान प्राप्त असणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ जुनी पेन्शन लागू करण्याकरिता समिती गठीत केली होती. सदरचा अहवाल अद्याप प्रलंबित असून मागण्याबाबत कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केली गेली नाही. १ नोहेंबर २००५ पुर्वी अंशतः /टप्पा अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची संख्या २६००० नसून अत्यल्प असून सर्वच लाभापासून वंचित आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सर्वच विभागातील १ नोहेंबर २००५ पुर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना लागू केली आहे त्याच आधारे खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना तात्काळ लागू करण्यात येवून शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा अन्यथा मयत कर्मचारी यांचे कुटुंबीय, सेवानिवृत्त शिक्षक बांधव, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शुक्रवार दिनांक ७/२/ २०२५ रोजी आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत.कृपया आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल. याची कृपया दखल घ्यावी ही नम्र विनंती. अशा आशयाचे प्रसिद्धीस पत्रक अध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर यांनी दिले आहे.
----------------------------------

