मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांवर संंतापले : मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच अजेंडा आला बाहेर

Kolhapur news
By -

 

          


मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीआधीच घेण्यात येणाऱ्या निर्णयांची माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेवेळी मंत्रिमंडळाच्या एका संभाव्य निर्णयाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी मंत्र्यांवर नाराजी व्यक्त करत खडेबोल सुनावल्याचे पाहायला मिळाले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मंत्रिमंडळ बैठक होण्याचा अजेंडा छापणे चुकीचे आहे. बैठक होण्यापूर्वी काही लोक अजेंडा छापत आहे. याबाबत मी मंत्र्यांनाही सांगितले आहे. मंत्र्यांनी आपल्या कार्यालयांना बैठकीपूर्वी अजेंडा न छापण्याचे सांगितले पाहिजे. अन्यथा मला कारवाई करावी लागले. हा अजेंडा गुप्त असतो. त्या गुप्ततेची शपथ आपण घेतली आहे. तसेत माध्यमांनी सुद्धा आपल्या खपासाठी आणि टीआरपीसाठी नियम मोडू नये.


 _-----------------------------------