कोल्हापूर न्यूज नेटवर्क
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांच्या बद्दल वापरलेल्या शब्दांमुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत.
शिवरायांचा व त्यांच्या असामान्य शौर्याचा अवमान होईल असे चुकीचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
त्यांच्या वक्तव्याने चुकीचा संदेश जनमानसांत जाऊ शकतो.त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
राहुल सोलापूरकर यांनी छ्त्रपती शाहू महाराज यांची भूमिका साकारली होती.त्यामुळे त्यांच्या कडून छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य शोभत नाही असे उद्गार शिवभक्त सर्जेराव भाट यांनी कोल्हापूर न्यूज शी बोलताना काढले.
शहरातील शिवभक्त व नागरिकांच्या वतीने मुरगूड पोलिस ठाण्याला तसे निवेदन देण्यात आले आहे.स.पो. नि.बाळासाहेब सरवदे यांनी निवेदन स्विकारले.
यावेळी भाट यांचे समवेत तानाजी भराडे,ओंकार पोतदार,संकेत शहा,विक्रम साळोखे,जगदीश गुरव,प्रकाश पारिष्वाड इत्यादी शिवभक्त व नागरिक उपस्थित होते.
-----------------------------------

