सी. पी. आर हॉस्पिटल मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे लुटणाऱ्या दोघांना अटक : जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांचे बनावट आदेश दिले होते

Kolhapur news
By -

 

            


                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क


             सीपीआर मध्ये नोकरी लावताे म्हणून जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांच्या बनावट सहीचे आदेश  देऊन फसवणूक करून  पैसे उकळणाऱ्या  दोघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली आहे. 


     पोलिसांनी अटक केलेल्या नितीन अशोक कांबळे  (राहणार कसबा वाळवे, तालुका - राधानगरी) व  (नागेश एकनाथ कांबळे राहणार शेळेवाडी ,तालुका -राधानगरी ) या दोघांना  आज न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे .पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम कणेरकर करत आहेत. 


              -----------------------------------