विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती प्रतिष्ठापनेच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त कोगनोळीतील कोळी मळ्यामध्ये विविध कार्यक्रम

Kolhapur news
By -

       

                


            


  

कोगनोळी : येथील हंचिनाळ रस्त्यावरील कोळी मळ्यामध्ये विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती प्रतिष्ठापनेच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले हाेते. 


   सकाळी ९ ते १२ ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील ९ व १२ व्या अध्यायाचे पारायण करण्यात  आले. सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, ६ ते ७ सूरदास गायकवाड महाराज यांचे प्रवचन, तर रात्री ७ ते ९ पूर्णानंद काजवे महाराज यांची कीर्तन सेवा होणार झाली.


   रात्री ९ वाजता आरती झाल्यावर महाप्रसादाचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता झाली .