शरद पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर : भारतीताई पवार यांचे निधन

Kolhapur news
By -

 

                


                        भारती पवार 


पुणे : पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे धाकटे बंधू उद्योगपती प्रतापवराव पवार यांच्या पत्नी भारती पवार (७७ वर्षे) यांचे निधन झाले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे. शरद पवार आणि प्रतापराव पवार हे सख्खे बंधू आहेत.


बारामतीचे पवार कुटुंब आणि त्यांचा गोतावळा फार मोठा आहे. वेगवेगळे भाऊ आणि त्यांची मुलं वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये आहेत. त्यापैकी प्रतापराव पवार आणि त्यांचे पुत्र अभिजीत पवार हे सकाळ माध्यम समूह चालवतात . प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार याचं पुण्यात निधन झालं आहे.

   

      औंधजवळील बालकल्याण संस्थेमध्ये त्या ३५ वर्षे सक्रिय होत्या. कोरेगाव पार्क आणि कोथरूड येथील अंधशाळेतही त्या विश्वस्त होत्या. 

----------------------------------------

   आम्ही पवार कुटुंब आज अत्यंत दुःखद प्रसंगाला सामोरे जात आहोत. आमच्या परिवारातील माझ्या धाकट्या काकी सौ. भारती प्रतापराव पवार यांच्या निधनाने आमच्या कुटुंबाची मोठी हानी झाली आहे. आईसमान असणाऱ्या माझ्या काकींबद्दलच्या लहानपणापासूनच्या अनेक आठवणी आणि त्यांचा लाभलेला सहवास माझ्या डोळ्यांसमोर तरळत आहे. काकींचा हसतमुख चेहरा, उत्साही आणि सतत कार्यशील राहण्याचा स्वभाव आमच्या नेहमी स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने प्रतापकाका, आम्ही सर्व बहीण-भावंडे आणि सर्व पवार कुटुंबियांच्या जीवनात कायमची पोकळी निर्माण झाली आहे. आमच्या लाडक्या भारतीकाकींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.


            - उपमुख्यमंत्री अजित पवार


   -------------------------------------------------