कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखली उपसरपंच पदावर मुश्रीफ गटाच्या जयश्री महादेव गळतगे यांची निवड करण्यात आली. निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच युवराज कुंभार होते.
यापूर्वीचे उपसरपंच कुमार संकपाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले , जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माजी सभापती शिवानी भोसले ,कागल तालुका संजय गांधी निराधार समिती सदस्य सदाशिव तुकान , प्रकाश वाडकर , माजी सरपंच अल्लाबक्ष सय्यद व छाया चव्हाण , माजी उपसरपंच मनीषा पाटील , विजय घस्ती व कुमार संकपाळ ,श्रीशैल नुल्ले , रवींद्र कस्तुरे , ज्योती डवरी , साधना जाधव, सरस्वती चिखलीकर , ग्रामविकास अधिकारी सूर्यकांत कुंभार , वैभव गळतगे ,सचिन सूर्यवंशी ,बाबुराव वाडकर ,बुरहान सय्यद, पाडुरंग गळतगे ,महेश गळतगे यांच्यासह इतर उपस्थित होते .
हात वर करून झालेल्या मतदानामध्ये जयश्री गळतगे यांच्या बाजूने नऊ सदस्यांनी तर विरोधात असलेल्या साधना जाधव यांच्या बाजूने तीन सदस्यांनी हात वर केला. तर एक सदस्य गैरहजर राहिले .
-----------------------------------







