मुंबई :बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सायंकाळी झालेल्या एका बैठकीत मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज धनंजय मुंडे यांनी आपल्या PA व ओएसडींच्या मार्फत आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तो तत्काळ स्वीकारला.
प्रकृती ठीक नसल्याने अन् सदसद्विवेक बुद्धीला स्मरून राजीनामा- धनंजय मुंडे
धनंजय मुंडे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
--------------------------------------

