मुंबई: भारतातील सर्वात मोठ्या स्मॉल-कॅप फंड मॅनेजरने इशारा दिला आहे की, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्स अजूनही प्रचंड महाग आहेत आणि त्यामध्ये आणखी घसरण होऊ शकते. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडचे मुख्य गुंतवणूक अधिकारी शैलेश राज भान यांनी सांगितले की, या सेगमेंटमधील दोन-तृतीयांश शेअर्स अजूनही जास्त किमतीचे आहेत आणि घसरण पूर्ण झालेली नाही.
गेल्या काही महिन्यांतील घसरणीनंतर बाजारात तेजी दिसून आली. परंतु ही रॅली फक्त लार्ज-कॅप शेअर्सपुरती मर्यादित राहिली. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केल्याने आणि कमकुवत तिमाही निकालांमुळे लार्ज-कॅप शेअर्स घसरले. दुसरीकडे मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये घसरणीचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या जास्त किमती आणि अपेक्षेपेक्षा कमी निकाल होय. त्यामुळे गुंतवणूकदारांनी विचारपूर्वकच आपली गुंतवणूक करावी .
----------------------------

