कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गोर गरिबांचे महाडॉक्टर ना. हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने नानीबाई चिखली मध्ये एचपीव्ही कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण मोहीम कन्या विद्या मंदिरात उत्साहात पार पडली . महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण असल्यामुळे मुलींच्या मध्ये कॅन्सर सारख्या रोगाचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी ही कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण मोहीम आयोजित केली होती. त्याचे उद्घाटन बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक प्रवीणदादा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोहिमेमध्ये एकूण ३० मुलींना लस देण्यात आली. त्याचबरोबर जनजागृती करून महत्त्व पटवून देण्यात आले .
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन सावंत , वरूण गुरव , वैभव गळतगे , सचिन सुर्यवंशी , वैद्यकीय अधिकारी भुसाळ, मुख्याध्यापक बाबासो कांबळे ,विक्रम गळतगे , कृष्णात मगदूम , राजेंद्र पोतदार यांच्यासह इतर उपस्थित होते.
--------------------------------------


