कोल्हापूर न्यूज नेटवर्क
चिखली इंग्लिश स्कूल, चिखली येथे एचपीव्ही लसीकरणाचा महत्वाचा उपक्रम नुकताच यशस्वीरित्या पार पडला. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून ही लस विद्यार्थिनींना उपलब्ध करून देण्यात आली.
या कार्यक्रमाला चिखली गावाचे सरपंच युवराज कुंभार, संजय गांधी निराधार योजना कागलचे सदस्य सदाशिव तुकान, विद्या प्रसारक मंडळ कुरुकलीचे संचालक धीरज मगदूम, मुख्याध्यापक एस. एस. बोरवडेकर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सौ सोनाली मुंढरे ,सौ गीता पोतदार , नम्रता दाभाडे, व्ही आर भगत सर्व आशा सेविका तसेच विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
शालेय स्तरावर आरोग्य जनजागृती आणि विद्यार्थिनींच्या सशक्त आरोग्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला. लसीकरणास विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या लसीकरण मोहिमेच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळणार असून, आरोग्यविषयक जाणीवजागृती वाढण्यास मदत होणार आहे. पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत यासाठी सहकार्य केले .
----------------------------

