मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर सभागृहात गंभीर आरोप

Kolhapur news
By -

         


मुंबई :  ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्याच्या प्रकरणात शरद पवार यांच्या पक्षाचा मोठा हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला आहे. या प्रकरणात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे आरोपी तुषार खरात याच्या संपर्कात होते. या प्रकरणाच्या विरोधात जे व्हिडिओ तयार केले गेले, ते आधी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आले असल्याचा मोठा आरोप देखील फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून राज्यभरात चांगलाच गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


  विरोधकांच्या वतीने विधिमंडळात मांडण्यात आलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे फडणवीसांनी आज दिली. या वेळी त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्याचा कट कशा पद्धतीने आखला गेला, याची माहिती दिली. तसेच या प्रकरणावरून त्यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचे कॉल रेकॉर्ड्स सापडल्याचा मुख्यमंत्र्यांनी  दावा केला आहे. 



 ----------------------------------