कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये प्रशांत कोरटकरला आणल्यानंतर पोलीस स्टेशन बाहेर शिवप्रेमी आंदोलकांनी कोल्हापुरी पायतान हातात घेऊन आंदोलन सुरू केले .बघता बघता शिवप्रेमींचा मोठा जमाव जमला .
त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. अशावेळी या तणावपूर्ण वातावरणात जुना राजवाडा पोलिसांनी कोरटकर ला मागच्या दारातून नेऊन कोर्टात हजर केले. त्यामुळे पोलीस स्टेशन समोर जमलेला जमाव अधिकच संतप्त झाला .कोरटकर तुमचा जावई आहे का अशा प्रकारच्या संतप्त भावना आंदोलक यावेळी व्यक्त करत होते.
प्रशांत कोरटकरवर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा व छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिस गत 25 फेब्रुवारीपासून त्याचा शोध घेत होते. पण तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी सोमवारी त्याला तेलंगणातून ताब्यात घेतले. तेलंगणात त्याच्या अटकेची योग्य ते सोपस्कार पार पाडल्यानंतर त्याला कोल्हापुरात आणले गेले. प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्याला तिथे आणले गेले आहे.
दरम्यान , त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला तीन दिवसांची पोलीस काेठडी सुनावली आहे .
-------------------------------------

