हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट साठी कोल्हापूर जिल्ह्यात दहा हजाराहून जास्त वाहनधारकांचे रजिस्ट्रेशन : प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर

Kolhapur news
By -

 

          


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


  हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट साठी कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार २६८ वाहनधारकांनी रजिस्ट्रेशन केले तर ५३६८ वाहनधारकांनी फिटमेंट केले असल्याची माहिती कोल्हापूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे . 


        हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट साठी कोल्हापूरात एकूण २९  सेंटर्स आहेत. १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना ही नंबर प्लेट बंधनकारक असून ही नंबर प्लेट बसवण्यासाठीची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२५ अशी आहे . शासनाच्या वैध वेबसाईटवर जाऊन वाहनधारकांनी आपली नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे . 


      -------------------------------------