आईने आपल्या मुलीसाठी केलेल्या त्यागाची ही गोष्ट आहे. आपल्या मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या आईनं हे पाऊल उचललंय. मीडिया रिपोर्ट्नुसार, अमेरिकेतील क्रिस्टी श्मिट यांची मुलगी आणि जावयाला मुल होत नव्हतं. त्यांना आपल्यालाही बाळ व्हावं, अशी इच्छा होती. मात्र, अनेक प्रयत्न केल्यानंतरही आणि वैद्यकीय उपचार घेतल्यानंतरही त्यांना यश मिळत नव्हतं. त्यानंतर क्रिस्टी श्मिट यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी सरोगसीच्या माध्यमातून आई होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्यासाठी सोपा देखील नव्हता. मात्र, आपल्या मुलीच्या आणि जावयाच्या आनंदासाठी त्यांनी वैद्यकीय चाचणी करुन घेतली आणि डॉक्टरांनी देखील ग्रीन सिग्नल दिला. त्यानंतर डॉक्टरांनी वैद्यकीय प्रक्रिया करत भ्रूण प्रत्यारोपण केले. दरम्यान, आता 9 महिन्यांनंतर त्यांनी जावई आणि मुलीच्या बाळाला जन्म दिलाय.
क्रिस्टी यांच्या मुलीला आपणही बाळाची आई व्हावं असं वाटत होतं. क्रिस्टी यांच्या मुलीच्या म्हणजेच हेईडीचा जॉनसोबत 2015 साली विवाह झाला होता. मात्र, अनेक वर्षांनंतर देखील तिला बाळ होत नव्हतं. त्यामुळे तिच्या पदरी निराशा पडली होती. अखेर 2020 साली हेईडीला पहिल्यांदा प्रेग्नंट झाल होती. मात्र, तिचा हा आनंद जास्त काळ टिकला नव्हता. कारण तिला गर्भाशयाच्या डिडेल्फीस नावाची दुर्मिळ समस्या होती. अशा अवस्थेत स्त्रीला जुळं होतं, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळे हेईडी जुळ्या मुलांची आई होणार होती. परंतु तिच्या दोन्ही मुलांनी जीव गमवावा. त्यामुळे हेईडीच्या आयुष्यात दुख;चा डोंगर कोसळला. डॉक्टरांनी असंही सांगितलं की, जर तुम्ही पुन्हा प्रेग्नंट झालात तर अंत्यत धोकादायक ठरु शकतं.
प्रेम आणि त्यागाची जगाच्या इतिहासात अनेक उदाहरण आहेत. मात्र, सध्या ही एक अनोखी घटना जगभरात चर्चेचा विषय बनली आहे .
---------------------------------------

