निपाणी : निपाणीतील हालसिद्धनाथ फॅक्टरी च्या बॉयलरला आग लागल्यामुळे एकच धावपळ उडाली. निपाणी , चिकोडी , संकेश्वर आणि कागल येथील अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यास यश मिळाले. सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
घटनास्थळी कारखान्याचे चेअरमन , व्हा. चेअरमन आणि संचालकांनी भेट देऊन पाहणी केली. आगी मध्ये पाच कोटीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
---------------------------------------

