कोल्हापूर न्यूज / वि . रा. भोसले
दिशा ही एका सर्वसामान्य घरातील मुलगी नोकरीच्या शोधात होती.सुशांत सिंग राजपूत या उदयोन्मुख अभिनेत्याची सेक्रेटरी म्हणून ती काम पाहत होती.
दिशा आणि सुशांत यांना जाऊन पाच वर्षे होत आली. त्या दोघांनीही आत्महत्या केली आहे असे मानले जात होते. तथापि अलीकडील काही बातम्या मुळे पुन्हा त्यांचे हे संशयास्पद मृत्यू पटलावर आले आहेत.
या दोघांच्याही मृत्यूस एक राजकीय नेता कारणीभूत आहे असे मानले गेले आहे.
आधी दिशा गेली आणि नंतर काही दिवसांनी सुशांत गेला. दिशाने एका उंच इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली असे दाखवले गेले आहे. तिच्या शरीरावर जखमा किंवा रक्ताचे डाग नव्हते. तिचा मृतदेह इमारतीच्या कंपाउंडच्या बाहेर पडला होता. तिने उडी मारली असेल तर तिचा देह कंपाऊंडच्या आतच पडला पाहिजे. त्यामुळे हे प्रकरण निश्चित संशयास्पद आहे.
सुशांत हा उदयोन्मुख अभिनेता होता .त्याचे दोन चित्रपट अत्यंत यशस्वी झाले होते . त्याला बॉलीवूडमध्ये आणखी चांगल्या संधी प्राप्त होणार होत्या .मग तो कशाला आत्महत्या करेल .तेव्हा त्याचा मृत्यू सुद्धा संशयास्पद आहे असे म्हणायला जागा आहे .
एकेक मुद्दा विचारात घेतला तर काय निष्पन्न होते ते पहाणे ईष्ट होईल.
पाच वर्षानंतर का होईना दिशाच्या वडिलांनी कोर्टात केस दाखल केली आहे. सुशांत च्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी बिहार हून आलेल्या पोलिसांना क्वारंटाईन केले गेले. हे असे करण्याचे कारण काय? त्या पोलिसांना चौकशी का करून दिली नाही? सगळेच गोलमाल आहे.
न्यायदेवता आंधळी असते असे म्हटले जात होते. अलीकडे न्यायदेवतेच्या मूर्तीवरील काळी पट्टी काढून टाकण्यात आली आहे. ती डोळस बनली आहे.
कायद्याचे हात खूप लांब असतात असे मानले जाते.
दिशावर बलात्कार झाला आणि तिला मारून टाकण्यात आले आहे.
तसेच सुशांत सिंग राजपूतला सुद्धा मारून टाकण्यात आले. असे आता मांडले गेले आहे व त्यानुसार चौकशी सुरू झाली आहे.
कायद्याचे हात खऱ्या आरोपी पर्यंत पोचतील का?
देशमुख हत्या प्रकरणात जर एखाद्या मंत्र्याला राजीनामा देण्याची वेळ आली आहे तर या दोन्ही प्रकरणात सुद्धा कितीही मोठी राजकीय व्यक्ती असेल तर तिच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
या दोघांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी राजकारणातून आली आहे अशी ओरड करण्यात येत आहे
दिशा सारख्या हजारो मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे बिहार हून मुंबईत येऊन आपल्या भवितव्याची स्वप्ने पाहणाऱ्या सुशांत सारख्या अनेक सामान्य तरुणांना न्यायदेवता न्याय देऊ शकेल का?
या प्रकरणात ज्यांची नावे घेतली जात आहे ते राजकीय पुढारी आजही अहंकारी भाषा वापरत आहेत .जणू काही न्याय देवतेला त्यांनी आपल्या घरी खांबाला बांधून ठेवले आहे.
या दोन्ही मृत्यू मागे जे कोणी असतील त्यांना शासन झालेच पाहिजे. तरच दिशा आणि सुशांत यांच्या आत्म्याला शांती मिळू शकेल.
----------------------------------------

