मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री नाम.एकनाथजी शिंदे साहेब यांनी नगरविकास विभागाकडून १० कोटींचा निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे पन्हाळा किल्ल्यावर शिवछत्रपतींचे स्मारक असावे अशी इच्छा बाळगणाऱ्या लाखो शिवप्रेमींची इच्छा पूर्ण होणार आहे.
यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, जालंदर पाटील सर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
---------------------------------------------

