जुन्या गाडी वरून अजितदादा भडकले : नवीन गाड्या घेण्याचा प्रस्ताव तातडीने पाठवण्याचा आदेश

Kolhapur news
By -

 

           


                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


         राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर त्यांना देण्यात आलेल्या जुन्या गाडी  वरून त्यांनी जिल्हा प्रशासनाचा समाचार घेतला . 

      

   अजित दादांना देण्यात आलेल्या कारचे व्यवस्थापन चांगल्या दर्जाचे नव्हते. तसेच त्यामध्ये टीव्ही पण नव्हता , त्यामुळे अजित दादांनी आत्ताच्या आत्ता नवीन गाड्यांसाठी प्रस्ताव देण्याचा प्रशासनाला आदेश दिला . त्यावर पाच गाड्यांसाठी प्रस्ताव दिला आहे, पण अजून मंजुरी मिळाली नसल्याचे प्रशासनाने त्यांच्या लक्षात आणून दिले . त्यानंतर दादांनी आत्ताच्या आत्ता प्रस्ताव पाठवा आणि निदान दोन गाड्या तरी  घेण्याची प्रशासनाला सूचना केली . 


दरम्यान, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीस अजित पवार येताच त्यांनी ताफ्यातील गाडी व्यवस्थित नसल्याचे सांगितले. त्यांच्यासाठी  पाठवण्यात आलेली चार चाकी व्यवस्थित नसल्याने गाडी बदलून घेण्याचे आदेश दिले. या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह इतर उपस्थित होते उपस्थित होते.