आज माणसे जेवढी एकनिष्ठ नसतात, तेवढी त्याकाळी कुत्री होती. हे दाखवण्यासाठी रायगडावर वाघ्या कुत्र्याचा पुतळा आवश्यक आहे : संभाजी भिडे गुरुजी

Kolhapur news
By -

              


आज माणसे जेवढी एकनिष्ठ 

नसतात, तेवढी त्याकाळी कुत्री होती. 

हे दाखवण्यासाठी रायगडावर वाघ्या 

कुत्र्याचा पुतळा आवश्यक आहे. 

निदान आताच्या युगात देशाशी 

एकनिष्ठ राहणे गरजेचे आहे. त्याचे 

प्रतीक म्हणून वाघ्या कुत्र्याचा पुतळा 

रायगडावर राहिला पाहिजे. 

स्वार्थासाठी कशीही मतं बदलणाऱ्या

माणसांना माझं मत पटणार नाही. 

       

           - संभाजी भिडे गुरुजी


      --------------------------


      रायगडावर पुतळा नको म्हणणारे काय म्हणतात..... 


पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी अचानक वाघ्या कुत्रा आला कुठून? कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नसताना विनाकारण खोट्या इतिहासाचे उदात्तीकरण का केले जात आहे.


संभाजी ब्रिगेडला तो मान्य नाही. या अगोदर सुद्धा एक ऑगस्ट 2012 साली संभाजी ब्रिगेडने वाघ्या कुत्रा काढून टाकला होता, प्रशासनाने तो परत बसवला. सरकारने स्वतः प्राधान्य तत्वावर वाघ्या कुत्रा पुतळा काढून टाकावा. औरंगजेबाच्या कबरीपेक्षा वाघ्या कुत्रा भयानक प्रकरण आहे.


कारण तो शिवाजी महाराजांच्या 'समाधी' शेजारी चिटकून उभा आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घेऊन तो काढून टाकावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे असे मत महाराष्ट्र संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी व्यक्त केले आहे.


याबाबत श्रीमंत कोकाटे म्हणाले, रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी याची पार्श्वभूमी इतिहासात नाही. महाराजांचे काळात असा कोणता कुत्रा होता व त्याने चिते मध्ये उडी घेतली याचा कोणताही उल्लेख कुठे मिळून येत नाही. तरी सुध्दा कुत्राचा पुतळा उभा करणे संर्दभहीन व महाराजांचा अपमान करणारा आहे. शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे उंची इतका हा पुतळा असून राजघराण्यातील इतर समाधी देतील त्याठिकाणी आहे. महाराजांचे महाराणी पुतळाबाई यांचे अंत्यविधी देखील सदर परिसरात झाले पण त्यांची समाधी नाही. रायगडवर अतिक्रमण असून ते हटवले गेले पाहिजे.


राम गणेश गडकरी यांनी राजसंन्यास नावाचे नाटक लिहिले ते इतिहासाला धरुन नाही. त्यांच्या डोक्यातून आलेली विकृत कल्पना म्हणजे हा वाघ्या कुत्रा आहे. लोकमान्य टिळक यांच्या अनुयायांनी हा पुतळा उभा करण्याचे षडयंत्र केले. छत्रपती संभाजीराजे यांनी जी वाघा पुतळा हटविण्याची मागणी केली आहे ती योग्य आहे. संभाजी ब्रिगेडने हा पुतळा यापूर्वी १३ वर्षा अगोदर हटवला होता परंतु शासनाने तो पुन्हा उभारला. कोणी मागणी, आंदोलन न करताही सरकारने हे काम केले. 



              ------------------