शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संस्कारक्षम नागरिक बनवावे - माजी आमदार संजयबाबा घाटगे : कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्यावतीने महिला सन्मान व सम्यक कार्यसम्राट आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

Kolhapur news
By -

 

         



              कोल्हापूर न्यूज नेटवर्क


         सुविधांचा सुकाळ असणारा युरोप कंगाल झाला आहे. संस्कार नसल्याचा हा परिणाम आहे. भारतीय संस्कृतीने मात्र संस्काराची अमूल्य देणगी दिली आहे. शिक्षक आणि आई-वडील हेच संस्काराची विद्यापीठं आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संस्कारक्षम नागरिक बनवावे, असे आवाहन संजयबाबा घाटगे यांनी केले.


 मुरगुड येथील श्रीराम मंगल कार्यालयात आयोजित कास्ट्राईब कर्मचारी महासंघांतर्गत कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित महिला सन्मान व सम्यक कार्यसम्राट आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये बोलत होते. सुरेश सोनगेकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी दीपक कांबळे होते.


     सुनील धुरंदर, सुरेश तांबे, राजाराम वरुटे, सतीश कांबळे, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, विजयकुमार जाधव, गणेश मढवी, बी.डी. धुरंदर, सुनील कुरणे, इर्शाद असोदे, सुनीता कांबळे आदींनी.मनोगत व्यक्त केले. यावेळी राजेंद्र कांबळे, सचिन वारनुळकर, प्रमोद मुहाड, राजेंद्र गाडे, संतोष मोहिते,गणेश मढावी, सुमित भुईंगड, नेताजी कमळकर, एस. के. पाटील, चंद्रकांत शेटे, आनंदा मालवेकर, प्रशांत वाळवेकर, वसंत जाधव,सुकमार पाटील, जयवंत पाटील आदींसह शिक्षक, कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत  व  प्रास्ताविक सुरेश सोनगेकर तर सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. संजय चिखलीकर यांनी आभार मानले.




          ------------------------------------------