मुंबई : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार थोड्याच वेळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्याची घोषणा या अर्थसंकल्पात होते का? लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची आश्वासन पूर्ती होते का? याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु
अजित पवार थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या आधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजूरी दिली जाणार आहे.
-----------------------------------

