कोल्हापूर न्यूज नेटवर्क
आदमापूर येथील श्री बाळूमामा मंदिरात भंडारा उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी आजपासून (१० मार्च) स्वच्छता मोहिमेस सुरूवात करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने मंदिर व परिसराची सखोल साफसफाई, सुशोभीकरण आणि इतर आवश्यक व्यवस्थांची तयारी केली जात आहे.
भंडारा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर १० ते १४ मार्चपर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. या काळात मंदिराच्या आतील आणि बाहेरील परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी आणि सजावटीची कामे केली जाणार आहेत.
आदमापूर देवस्थान समितीच्या कार्याध्यक्षा रागिनी खडके यांनी भक्तगणांना सहकार्याची विनंती केली असून, १४ मार्चनंतर मंदिर नियमित दर्शनासाठी खुले होणार आहे. भंडारा उत्सवाच्या तयारीला गती मिळाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
----------------------------------

