कोल्हापूर न्यूज नेटवर्क
आंतरराष्ट्रीय महिला दिवस आज साजरा करत असताना माता भगिनींनी आपल्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे हे जग तिच्यामुळेच उभे आहे तिच्या अंतर्मनामध्ये अनेक शक्ती वास करत आहेत या शक्ती तिने ओळखल्या पाहिजेत.
पुरुषांच्या शरीरात पंचमहाभूत शक्ती आहे तर महिला अंबामातेच्या स्वरूपात आहे. प्रेम, करुणा आणि वात्सल्य शांती सात्विक संवेदना तिच्या कडे आहे म्हणूनच ती जननी आहे असे उदगार परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांनी काढले. जागतिक महिला दिनानिमित महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र यांच्या वतीने गांधी मैदान येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी राज्यस्तरीय महासंमेलन व कुंकूमार्चन सोहळा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी रामदेव महाराज यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना रामदेव महाराजांनी स्वदेशीचे व्रत घेऊ, विदेशी उत्पादन मुळे देशाचा पैसा विदेशात जातो. त्यामुळे स्वदेशी शिका स्वदेशी वस्तू वापरा स्वदेशी चिकित्सा स्वदेशी संस्कृती यांचे जतन करा गायमातेची पूजा करा यातून मोठ्या संकल्पची पूर्ती होते असे सांगून प्रत्येक घराला , गावाला रोगमुक्त करणार असा शुभ संकल्प केला.
---------------------------------------



